गजानन विजय ग्रंथ

गजानन विजय ग्रंथ

॥ हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी । दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥ जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा । तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥ दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण । साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥ निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र । चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥ दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला । अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥ गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी । बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥ त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा । कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥ ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत ।।

संपूर्ण ग्रंथ

गजानन विजय ग्रंथ मराठी (संपूर्ण ग्रंथ डाउनलोड)

गजानन विजय ग्रंथ (अध्याय डाउनलोड)

ऑडिओ : श्रीमती सुमती ताई बापट

अध्याय १

शेगावी माघमासी ॥ वद्य सप्तमी ज्या दिवशी । हा उदय पावला ज्ञानराशी । पदनताते तारावया ॥

अध्याय १ डाउनलोड

अध्याय ऑडिओ

अध्याय २

‘गण गण’ हे त्यांचे भजन । हमेशा चाले म्हणून ।
लोकांनी दिले अभिधान । गजानन हे तयाला ॥

अध्याय २ डाउनलोड

अध्याय ऑडिओ

अध्याय ३

जय जय अवलिया गजानना । हे नरदेहधारी नारायणा ।
अविनाशरूपा आनंदघना । परत्परा जगत्पते ॥

अध्याय ३ डाउनलोड

अध्याय ऑडिओ

अध्याय ४

या गजानन रूपी जमिनीत । जे जे काही पेराल सत्य ।
ते ते मिळणार आहे परत । बहूत होऊन तुम्हाला ॥

अध्याय ४ डाउनलोड

अध्याय ऑडिओ

अध्याय ५

श्रीगजाननलीलेचा । पार कधी न लागायचा ।
अंबरीच्या चांदण्यांचा । हिशेब कोणा न लागे कधी ॥

अध्याय ५ डाउनलोड

अध्याय ऑडिओ
अध्याय ६

शेनिर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी ।
ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी । लीलामात्रे धरीले मानवदेहासी ॥

अध्याय ६ डाउनलोड

अध्याय ऑडिओ
अध्याय ७

हा वृषभ देव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा ।
किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥

अध्याय ७ डाउनलोड

अध्याय ऑडिओ
अध्याय ८

क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापिला । क्षणात गमनाप्रती करिसी इच्छीलेल्या स्थला ।
क्षणात स्वरुपे किती विविध धारिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥

अध्याय ८ डाउनलोड

अध्याय ऑडिओ
अध्याय ९

शेगावी माघमासी । वद्य सप्तमी ज्या दिवशी । हा उदय पावला गजाननपदी निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा ।
कुतर्कासी मुळी न द्यावा । ठाव आपूल्या मानसी ॥

अध्याय ९ डाउनलोड

अध्याय ऑडिओ
अध्याय १०

ज्याची निष्ठा बसेल । वा! जो माझा असेल ।
त्याचेच कार्य होईल । इतरांची ना जरूर मला ॥

अध्याय १० डाउनलोड

अध्याय १० ऑडिओ
अध्याय ११

सुर्याप्रमाणे सतेज कांति । आजानुबाहु निश्चिती ।
दृष्टी नासाग्राच्या वरती । स्थिर जायची झाली असे ॥

अध्याय ११ डाउनलोड

अध्याय ११ ऑडिओ
अध्याय १२

कधी गणगणाचे भजन । कधी धरावे नुसते मौन ।
कधी राहावे पडून । शय्येवरी निचेष्ठित ॥

अध्याय १२ डाउनलोड

अध्याय १२ ऑडिओ

अध्याय १३

शेगावचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेसी ।
म्हणून लाधले तयासी । गजानन हे संत रत्न ॥

अध्याय १३ डाउनलोड

अध्याय १३ ऑडिओ
अध्याय १४

तूच सोवळा साचार । एक आहेस भुमिवर ।
करण्या जगाचा उद्धार । तुम्हा धडिले ईश्वराने ॥

ध्याय १४ डाउनलोड

अध्याय १४ ऑडिओ

अध्याय १५

गजानन गुणागरा परम मंगला पावना । अशीच अवघे हरी दुरित तेवि दुर्वासना ।
नसे त्रिभुवनामध्ये तुजविणे आम्हा आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥

अध्याय १५ डाउनलोड

अध्याय १५ ऑडिओ
अध्याय १६

सवे शिष्य अपार । बसले होते मंडलाकार ।
ते शिष्य नव्हते किरणे थोर । त्या गजानन भास्करची ॥

अध्याय १६ डाउनलोड

अध्याय १६ ऑडिओ
अध्याय १७

ते पूर्ण ब्रह्म जागचालक ज्ञानराशी । ऐसे युगायुगी किती अवतार घेसी ।
झाल्यास दर्शन तुझे, भय रोग चिंता । नासे गजाननगुरो! मज पाव आता ॥

अध्याय १७ डाउनलोड

अध्याय १७ ऑडिओ
अध्याय १८

गण गण गणात बोते’ । हे भजन प्रिय सद्गुरुते । या श्रेष्ठ गजानन गुरुते ।
तुम्ही आठवीत रहा याते ॥

अध्याय १८ डाउनलोड

अध्याय १८ ऑडिओ

अध्याय १९

मी गेलो ऐसे मानू नका । भक्तित अंतर करू नका ।
कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच ॥

अध्याय १९ डाउनलोड

अध्याय १९ ऑडिओ
अध्याय २०

खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥ म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा । पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥

अध्याय २० डाउनलोड

अध्याय २० ऑडिओ
अध्याय २१

श्री गजानन स्वामी-चरित । जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ । श्रीगजाननकृपेने ॥
दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला । अनुपम येईल भाग्य त्याला I श्रीगजाननकृपेने ॥

अध्याय २१ डाउनलोड

अध्याय २१ ऑडिओ

आरती

श्री गजानन स्वामी-चरित । जो नियमे वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ I श्रीगजाननकृपेने ॥
दशमी एकादशी द्वादशीला I हा ग्रंथ जो वाची भला । अनुपम येईल भाग्य त्याला I श्रीगजाननकृपेने ॥

आरती डाउनलोड

आरती